Pune-Nashik Railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी,प्रवास सुकर होणार

एमपीसी न्यूज : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली. (Pune-Nashik Railway) पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

Alandi News : आळंदीमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल’.

त्याचबरोबर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी 13,539 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आभार व्यक्त करतो’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.