Bhosari News: पुणे-नाशिक हायवे वरून जाणाऱ्या दुचाकीवर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज: पुणे-नाशिक हायवे वरून जाणाऱ्या दु चाकीवर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. काल 6 ऑगस्टला शनिवारी सकाळी ही घटना घडली. (Bhosari News) या दोघांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

 

 

 

गोविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे म्हणाले की निलेश शिंगाळे, वय 36, रा. होलेवाडी, तालुका- खेड ,जिल्हा पुणे व समाधान पाटील, रा. होलेवाडी, तालुका- खेड, जिल्हा पुणे ह्या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सुहास खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे म्हणाले की म्हाळुंगे चाकण येथून शिवाजीनगर पुणे कडे जात असताना गुडविल चौक येथे त्यांच्या मोटरसायकलवर अचानक झाड पडले. ते दोघे झाडात अडकले तर मोटरसायकल 100 ते 150 मीटर पुढे जाऊन पडली.(Bhosari News) दोघांच्या डोक्यावर मार लागल्याने ते बेशुद्ध व जखमी झाले. त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. 

 

Today’s Horoscope 7 August 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने माहिती दिली की त्यांना 7.09 वा काल सकाळी वर्दी मिळाली की एक झाड पुणे – नाशिक हायवे वर पडले होते. (Bhosari News) पिंपरी मुख्यालय व भोसरी केंद्राचे प्रत्येकी एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. झाड मोठे असल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक हायवेच्या दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने चालु होती व वाहतूक कोंडी होती. सुमारे 30 ते 45 मिनिटात झाड कापून हटवण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.