Pune News : पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प चार वर्षात पूर्ण होईल – अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज : विविध कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे ते नाशिक हा महत्त्वाकांक्षी सेमी हायस्पीड प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या केंद्र आणि राज्य पातळीवरील परवानग्या लवकरच मिळतील राज्याच्या कॅबिनेट पुढे हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी येणार असून येत्या चार वर्षात पुणे-नाशिक हायस्पीड प्रकल्प पूर्ण होईल अशी ग्वाही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप  कार्यक्रमात ते बोलत होते.

कोल्हे म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी चांडोली, चाकण, मोशी याठिकाणी सहापदरी रस्ता करण्यात येणार आहे. यामधील राजगुरुनगर घाट बायपास प्लॅन दिवाळीमध्ये सुरू होणार आहे.

किल्ल्यांचे स्वच्छता म्हणजे केवळ संवर्धन नव्हे तर यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. किल्ल्याच्या संवर्धनाच्या माध्यमातून राज्यामध्ये पर्यटन व्यवसायास चालना मिळू शकते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.

भीमाशंकर येथे राष्ट्रीय वनौषधी प्रकल्पसाठी नुकतेच प्राथमिक सादरीकरण करण्यात आले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येईल. पर्यटन वाढीच्या दृष्टीने भक्ती-शक्ती प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्नर येथे शिव संस्कार सृष्टी उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नुकतीच चर्चा झाली असून पुणे जिल्ह्यातील पर्यटन वाडी साठी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे

बैलगाडा शर्यती सुरू करून या तून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग यांच्याशी नुकतीच बैठक पार पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.