Pune : ‘पर्यावरणीय ,नैतिक, सांस्कृतिक चिंता’ विषयावर 45 शोध निबंध सादर

'पूना इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस 'येथे राष्ट्रीय चर्चासत्र

एमपीसी न्यूज- ‘पूना इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्यरशिप ‘येथे नुकतेच ‘ इंडस्ट्री ४.० :पर्यावरणी ,नैतिक,सांस्कृतिक चिंता ‘ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले.

चर्चासत्रामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कम्पनीचे माजी उपाध्यक्ष पी. आर. त्रिवेदी, आयबी मॅनेजमेंट स्कुल (दिल्ली)चे संचालक डॉ. फैसल अहमद, ‘पूना इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्यरशिप ‘चे संचालक डॉ. शकील अहमद उपस्थित होते.

पी. आर. त्रिवेदी यांनी आधुनिकीकरणावर प्रकाश टाकला. डॉ. फैसल अहमद यानी आपल्या मनोगतामध्ये बदलत्या काळानुसार आपणही बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

चर्चासत्राच्या दुस-या दिवशी सेंट जोसेफ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसुझा, आयआयसीएमआर चे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, प्राज कम्पनीचे समीर कुकडे, इंटेलिमेंट टेक्नॉलॉजीचे प्रशांत पानसरे, ‘मास्क ‘च्या व्यवस्थापक श्रीमती नेहा केजरीवाल, उद्योजिका श्रीमती पल्लवी बंडगर,डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे डॉ. अझरुद्दीन, ‘ओएचआर ‘चे प्रदीप तुपे उपस्थित होते.

यावेळी एकूण ४५ शोधनिबंधाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये करण्यात आले व पुणे जिल्हा परिसरातुन सुमारे १०५ विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. डॉ. शीना अब्राहम यांनी आभार मानले. चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी डॉ. अजुम सैयद, डॉ. शीना अब्राहम यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.