BNR-HDR-TOP-Mobile

Pune : राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत काव्याची देदीप्यमान कामगिरी

सुवर्ण, दोन रौप्य आणि ब्रॉंझ पदकाची कमाई

एमपीसी न्यूज – हैद्राबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत येरवडा येथील विबग्योर हायस्कुलची विद्यार्थिनी काव्या जाधव हिने दैदीप्यमान कामगिरी करीत एक सुवर्णपदक, दोन रौप्य (एक जोडीने व एक सांघिक) आणि एका ब्रॉंझ पदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे तिची येत्या फेब्रुवारी 2020 मध्ये दुबई येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

काव्या जाधव ही राष्ट्रीय प्रशिक्षक राहुल पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आई-वडील, शिक्षक, प्रशिक्षक यांचे पाठबळ आणि कसून सराव केल्याने आपण हे यश मिळवू शकल्याचे काव्या हिने सांगितले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3