Pune  : ‘फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम’ या विषयावर गुरुवारी  राष्ट्रीय वेबिनार 

National webinar on 'Future of Education System' on Thursday

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी’ तर्फे ‘फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम’ विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.  हा वेबिनार दि.२८ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे. 

इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, समन्वयक सबा शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

महाविद्यालयांचे प्राचार्य, प्लेसमेंट ट्रेनिंग ऑफिसर, विभागप्रमुख , प्राध्यापक, एच आर विभाग प्रमुख या वेबिनार मध्ये सहभागी होवू शकतील.

केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ.अभय जेरे हे या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

सरकारचे शैक्षणिक नियोजन, शैक्षणिक प्रणाली ४.०, कोविड १९ नंतरची शैक्षणिक व्यवस्था या विषयावर वेबिनारमध्ये चर्चा होईल. सहभागासाठी साठी  https://forms.gle/RS4phiesrCg57pmf6 या लिंकवर  नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.