_MPC_DIR_MPU_III

Pune : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार फेसबुक पोस्टद्वारे म्हणतात,’साहेब’ खचून जात नाहीत; अजितदादांनी स्वगृही परतावं

एमपीसी न्यूज – सध्या राज्यात राष्ट्रवादी पक्षाचे राजकारण पाहता याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार फेसबुक पोस्टद्वारे म्हणतात, ‘साहेब’ खचून जात नाहीत. अजितदादांनी स्वगृही परतावं, असं म्हणणं मांडलं आहे.

_MPC_DIR_MPU_IV

यात रोहित पवार फेसबुक पोस्टद्वारे पुढे लिहतात, लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत. अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

_MPC_DIR_MPU_II

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं, असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,

पण, कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो. आणि अखेरपर्यन्त लढत राहतो, तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत. अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.

लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल. पण, यात हक्काची माणसं दूरावू नयेत, असं व्यक्तिश: वाटतं.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.