Pune News : पुण्यातील 22 वर्षीय पार्थ कश्यप पहिल्याच प्रयत्नात UPSC परिक्षा उत्तीर्ण

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (UPSC) शुक्रवारी (दि.24) निकाल जाहीर करण्यात आला. या परिक्षेत शुभम कुमारने पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच पुण्यातील पार्थ कश्यप हा 22 वर्षीय विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात UPSC परिक्षा उत्तीर्ण झाला आहे.

पार्थ कश्यप याला 174 वी रॅंक मिळाली आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ‘जन प्रबोधिनी’ आणि ‘स्वरुपवर्धिनी’ या अभ्यासिकेत त्याने UPSC परिक्षेसाठी तयारी केली.

‘शिक्षक आणि वरिष्ठ मार्गदर्शक यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे पार्थ कश्यप म्हणाला. ‘इंटरनेटचा योग्य वापर, UPSC परिक्षेचे स्वरूप समजून योग्य विश्लेषण करून अभ्यास केल्यास परीक्षा सोपी होते,’ असे कश्यपने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.