Pune News: दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची रविवारी रंगणार अंतिम फेरी

एमपीसी न्यूज : नाट्यसंस्कार कला अकादमी तर्फे आयोजित 31व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी रविवार म्हणजे 7 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. (Pune News) ही स्पर्धा पुण्यातील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृह येथे सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे.

MPC News Podcast 5 August 2022: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पाॅडकास्ट

प्राथमिक फेरीच्या स्पर्धा या 31 जुलै रोजी 6 गटात झाल्या होत्या. या प्राथमिक स्पर्धेत चारशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शहराच्या विविध भागातील पाच केंद्रां वर प्राथमिक फेरी झाली. प्रत्येक गटात मिळून अशा एकूण 90 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. (Pune News) अंतिम फेरी रविवारी सकाळी दहाला सुरु होणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी निवेदनाद्वारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.