Pune : राष्ट्रवादीकडून मी मंत्रिपदाची शपथ घेणार – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पुण्यातील समता भूमिवर आयोजित कार्यक्रमानंतर भुजबळ गुरुवारी पत्रकरांशी बोलत होते.

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्ताने छगन भुजबळ आणि फादर दिब्रिटो यांनी फुले वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव निश्चित केले आहे.

विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेणे हे महत्वाचे असून, तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालणार, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.