Pune: पुणे महापालिकेने कराबाबत अभय योजना राबवण्याची राष्ट्रवादीची मागणी

Pune: NCP demands implementation of Abhay Yojana for tax on Pune Municipal Corporation पुणे महापालिकेचा मिळकत कर वेळेत न भरल्यास प्रतिमहा 2 टक्के दंड आकारला जातो. म्हणजेच एका वर्षात 24 टक्के इतका दंड आकारला जातो.

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर मिळकत कराबाबत अभय योजना राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर आणि नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी केली आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेचा मिळकत कर वेळेत न भरल्यास प्रतिमहा 2 टक्के दंड आकारला जातो. म्हणजेच एका वर्षात 24 टक्के इतका दंड आकारला जातो.

दंडाची ही रक्कम जाचक असून, नागरिकांकडून दंडाची रक्कम कमी करण्यासाठी अनेक वेळा मागणी केली जाते. पुणे महापालिकेकडून यापूर्वी मिळकत कराची अभय योजना राबवून दंडाच्या रक्कमेतून सूट देण्यात आली होती.

त्यावेळी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. वास्तविक मिळकत कराची पावती प्राप्त न झाल्याने अनेक नागरिकांकडून हा कर वेळेत भरला जात नाही.

त्यानंतर दंडाची जाचक रक्कम मिळकत करत समाविष्ट होऊन गोरगरीब नागरिकांना ही रक्कम भरणे शक्य होत नाही. पर्यायाने दंडाची रक्कम वाढतच जाते.

सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेने मिळकत काराबाबत अभय योजना राबविली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेने अभय योजना राबवावी, अशी मागणी दीपक मानकर आणि भय्यासाहेब जाधव यांनी केली आहे.

या विषयाचा विचार 1 महिन्याने करावा, असे दिनांक 12 मे 2020 च्या सभेत ठरले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.