Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर्स सेलतर्फे ‘डॉक्टर्स डे ‘ निमित्त रविवारी डॉक्टरांचा सन्मान

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहरतर्फे रविवारी (दि. 30) ‘डाॅक्टर्स डे ‘ निमित्त वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डाॅक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे रात्री 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहराध्यक्ष डाॅ सुनील जगताप यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, मनपाचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, डॉ. रजनी इंदुलकर, राजेंद्र अप्पासाहेब पवार, नंदा राजेंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉक्टरांच्या मनोरंजनासाठी ‘आबा की आयेगी बारात’ हा विनोदी नाटयप्रयोग देखील या कार्यक्रमात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.