Pune : राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ‘पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी जाणार

पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप यांची माहिती

एमपीसी न्यूज- पूर ओसरल्यावर साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी तसेच सर्व प्रकारच्या उपचारांसाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल कोल्हापूर -सांगली भागात जाणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास पुणे श्रमिक पत्रकार संघ येथून रुग्णवाहिका आणि डॉक्टर्स मंडळी सांगली -कोल्हापूर कडे रवाना होणार आहेत.

सांगली, कोल्हापुर व वाळवा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उदभवली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. पूर ओसरला की विविध आजार पसरण्यास सुरुवात होऊ शकते. अशावेळी गावागावात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत लागणार आहे. या साठी राष्ट्रवादी डॉक्टर सेलने सामजिक जबाबदारी म्हणून वैदयकिय मदत करण्याचे ठरवले आहे

डॉक्टर्स सेलने मदतकार्य करावे अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यासाठी औषधांची उपलब्धता व लागणारे सर्व सहकार्य पक्षातर्फे उपलब्ध केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पवार हे ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे पदाधिकारी त्यासाठी समन्वय साधत आहेत. मदतकार्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी डॉ. हेमंत तुसे 9822450437, डॉ. राहुल सूर्यवंशी 9823071617, डॉ. राजेंद्र जगताप 9922343468 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.