NCP Lolipop Protest : “महाराष्ट्र को क्या मिला ? लॉलीपॉप लॉलीपॉप,” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरु

एमपीसी न्यूज : आज राज्यभरात वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून आंदोलने करण्यात येत आहेत.(NCP Lolipop protest) पुण्यातही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने एक आगळ-वेगळ आंदोलन करण्यात येत आहे. वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने पुणे जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या विरोधात पुण्यातील बालगंधर्व चौकात आज गुरूवारी लॅालिपॅाप आंदोलन सुरू आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या  विरोधात आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने सुरु आहेत.(NCP Lolipop Protest) खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रबाहेर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिले आहे. “पण हा केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप राज्याला दिला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रसने पुण्यातील बालगंधर्व चौकात लॉलीपॉप आंदोलन सुरु केले आहे.

“महाराष्ट्र को क्या मिला ? लॉलीपॉप लॉलीपॉप,” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत.

RPI Women state president : रिपब्लिकन पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांता सोनकांबळे यांची निवड

वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये जाणार आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने आपला प्रकल्प गुजरातमध्ये हलवला आहे. यावरुन शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.(NCP Lolipop Protest) त्यातच आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प देखील महाराष्ट्रातून बाहेर जाणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. रिफायनरी प्रकल्प करणारी कंपनी आरआरपीसीएल राज्य सरकारला एक महिन्याची मुदत देण्याची तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प हा 2018 पासून रखडलेला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.