Pune: गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांकडून  निषेध

Pune: NCP MLAs, MPs protest against Gopichand Padalkar's statement

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर अतीशय खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांकडून निषेध करण्यात आला.

सध्या भाजप व त्या विचारधारेतील मंडळींना सत्ता गेल्याने मानसिक रोगाने पछाडले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर ज्यांची बोलायची लायकी नाही, असे अनेक लोक गेले काही दिवस भ्रमिष्ट झाल्यासारखे बरळत आहेत. यातून ते लवकर बरे व्हावेत, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय अशा या वर्तणुकीचा व वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण आणि आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही. बारामती विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त करून जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. किमान आता तरी त्यांनी जपून आणि भान ठेवून बोलावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पडळकरांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार सुनील टिंगरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.