Pune : शरद पवार यांच्या अपमानाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज : निवडणूक जवळ आली, की पवार साहेब मुस्लीम (Pune) समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार अशा प्रकारच ट्विट भाजपचे नेते निलेश राणे यांनी केले असून त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी आक्रमक झाल्याच पाहण्यास मिळत आहे.

त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातारा रोड येथे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. टिल्लू पिल्लू गँग औकातित रहा… या आशयाच फलक तयार करून निलेश राणे विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाला जवळपास 55 वर्षापासुन दिशा देण्याच काम केले आहे. शरद पवार यांच्या कार्याला देशातील प्रत्येक नेता सलाम करतो. पण (Pune) भाजपमधील नितेश राणे, निलेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे ज्या प्रकारे टीका करीत आहेत, त्या तिघांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. त्या तिघांनी जपून शब्द वापरावे. अन्यथा आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

Chinchwad : …तर महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील – आयुक्त सिंह

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.