Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची राष्ट्रवादीची तयारी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे 62 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. 1- 1 बेडससाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव कासावीस होत आहे. मात्र, सत्ताधारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्ताधारी मंडळी विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 300 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे संकट काही आटोक्यात येत नाही. प्रशासनातर्फे कोणतेही नियोजन नाही.

त्यावर  विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, माजी महापौर दत्ता धनकवडे, प्रशांत जागताप, उपमहापौर दीपक मानकर, दिलीप बराटे, जेष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

कोरोनाचे 1 हजार मृत्यू लपविण्यात आल्याचा आरोप खुद्द महापौरांनीच केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. हा आरोप अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आयुक्त आणि आरोग्य प्रमुखावर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या आरोपावर ठाम आहेत, तर प्रशासनातर्फे मात्र हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. योग्यवेळी आपण पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचे महापौरांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.