Pune: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी 

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Pune)शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आला आहे. त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर जगताप ज्येष्ठ नेते (Pune)शरद पवार यांच्या गटात राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा निकाल देण्यात आल्यानंतर जगताप यांनी टीका केली.

Mp Shrirang Barne : पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी

गेल्या चार दिवसांपासून जगताप यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकीचे संदेश पाठविण्यात येत आहेत. राजकीय भाष्य केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी जगताप यांना देण्यात आली आहे. जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून धमकीचा संदेश अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत आहे. राजकीय परिस्थितीवर टीका केली, तसेच आंदोलन केल्याने मला धमकावले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करून धमकी देणाऱ्यास अटक करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.