Pune Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. सुप्रिया बर्गे

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी यशश्री फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

ॲड. सुप्रिया बर्गे यांनी यशश्री फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे गरजू महिलांना कायदेशीर मदत केली. शेतीविषयक कायदे, मोटार वाहन अपघात कायदे, घरगुती हिंसाचा, शक्ती कायदा आदी अनेक कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यशाळांचे त्यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आयोजन केले आहे. लैंगिक शोषण रोखण्यासाठीही कार्यशाळा आयोजित करून बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठीही त्या कायम तत्पर असतात.

गुन्हेगारी रोखण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील आहेत.

आगामी काळात पदाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाईल. शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी कायदा मार्गदर्शन कार्यशाळा, गोरगरीब मुली आणि महिलांमध्ये महिलांविषयीच्या कायद्यांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ॲड. सुप्रिया बर्गे यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.