Pune : शहरात आढळले आणखी नवे 10 ‘कोरोना’बाधित -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे शहरात काल रात्री उशिरा आणि सकाळच्या सत्रात एनआयव्ही (NIV)कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार १० जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे रुग्ण कोंढवा, मोमीनपूरा आणि गुरुवार पेठ भागातील आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मागील चार दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रविवारी 24 तासांत तब्बल तीन जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनाचे वाढते रुग्ण ही पुणेकरांसाठी काळजी वाढविणारी बाब आहे. याचे रुग्ण झोपडपट्टीत आढळून येत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.