Pune: पुणे जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 19 रुग्ण, नव्या 33 रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 781

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्ह्यात नव्याने आढळलेले 19 कोरोनाबाधित रुग्णांसह राज्यात आज आतापर्यंत 33 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 781 वर जाऊन पोहचली आहे.

राज्याच्या आरोग्य खात्यामार्फत ही माहिती देण्यात आली आहे. नवीन रुग्णांमध्ये पुणे 19, मुंबई 11 तर सातारा, अहमदनगर व वसई प्रत्येकी एकाचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणखी 33 वाढली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 45 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांच्या संख्येची शंभरीच कालच पूर्ण झाली होती. त्यात आणखी भर पडल्याने हा आकडा दीडशेच्या जवळपास गेला आहे. पुणे शहरात काल तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने शहरातील कोरोना बळींची संख्या पाचवर जाऊन पोहचली आहे. त्यात नवीन 19 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.