Pune : शहरात नवीन चार कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णांची एकूण संख्या 27 वर!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आणखी चार रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 27 वर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्व संशयित रुग्णांच्या कोरोना चाचणीचे अहवाल मात्र निगेटीव्ह आल्याने पिंपरी-चिंचवडकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा 17 वर्षीय मुलगा, 44 वर्षीय बहीण, बहिणीचा 47 वर्षीय नवरा व  बहिणीची 21 वर्षीय मुलगी अशा चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोनाबाधित 27 रुग्णांपैकी 26 रुग्णांची प्रकृती स्थिर असून एक रुग्ण मात्र अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर असून त्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कालपर्यंत पुण्यात 11  तर पिंपरी-चिंचवडला 12 कोरोनाबाधित रुग्ण होते. आता पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 झाली असून पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या 12 वर स्थिर आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्षता घ्यावी, गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.