Pune: शहरात 78 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,217, कोरोना बळींचा आकडा 75 वर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज दिवसभरात कोरोनाच्या 78 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,217 झाली आहे. दिवसभरात आज तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 75 झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले 11 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  आतापर्यंत एकूण 176 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 921 कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. शहरातील 49 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. त्यापैकी 30 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये तर उर्वरित रुग्णांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहे. मृत आणि कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वजा करता पुण्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 966 झाली आहे.

शहरात आतापर्यंत एकूण 176 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यापैकी नायडू रुग्णालयातून 87, भारती (पीएमसी) रुग्णालयातून 10, सिम्बायोसिसमधून 57, सह्याद्री (नगर रोड) रुग्णालय 1, भारती रुग्णालय 1, केईएम रुग्णालय 7, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय – 1 , जहांगीर रुग्णालय 2 , पूना हॉस्पिटल 1, सह्याद्री रुग्णालय (कर्वे रोड) 2, सह्याद्री रुग्णालय (हडपसर) 1, रुबी हॉल क्लिनिक 1, नोबेल रुग्णालय 1, व  ससून रुग्णालयातून 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात परदेशातून आलेल्या एकूण  9,775 प्रवाशांपैकी 6,777 प्रवाशांना अजूनही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.  आतापर्यंत 2,988 प्रवाशांनी 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे.

शहरात कोरोनाबाधित मृतांची एकूण संख्या 75 झाली आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे 55 मृत्यू ससून रुग्णालयातील आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात चार कोरोनाबाधित मृतांची नोंद आहे. औंध जिल्हा रुग्णालय, नोबेल रुग्णालय व केईएम रुग्णालयात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.  नायडू रुग्णालय, इनामदार रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय (कर्वे रोड), पूना हॉस्पिटल, सिम्बायोसिस, इनलॅक्स बुधराणी रुग्णालय, भारती रुग्णालय, एआयसीटीएस, वायसीएममध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित मृताची नोंद आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.