Pune : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती – हेमंत रासने

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महसूल कक्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. 11 सदस्यांचा या समितीत समावेश असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

“पुणे महापालिकेचे उत्पन्न दरवर्षी 4 ते साडेचार हजार कोटीं पर्यंतच जाते. यंदा त्यामध्ये किमान 1 हजार कोटींची वाढ होण्याची अपेक्षा हेमंत रासने यांनी व्यक्त केली. त्यासाठीच ही महसूल कक्ष समिती आहे. प्रॉपर्टी टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे. त्यामुळे आगामी काळात कोणतीही पुणेकरांवर करवाढ न करता गळती शोधण्यावर भर देणार”असल्याचे रासने म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.