Pune New Containment Zones: पुणे शहरात आता कोरोनाचे 109 कंटेन्मेंट झोन

 महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा नवा आदेश जारी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिका अधिकारी- कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे. मात्र, या  रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात 109 कंटेन्मेंट झोन (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा दिले.
दिनांक 1 जुलै 2020 रात्री 12 पासून पुढील आदेश येईपर्यंत कंटेन्मेंट झोन क्षेत्र जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी दिनांक 17 जून रोजी 74 कंटेन्मेंट जाहीर करण्यात आले होते. आता त्यामध्ये आणखी 35 कंटेन्मेंट झोन वाढ करण्यात आली आहे. कोथरूड, घोरपडी, खराडी, हडपसर, कर्वेनगर, एरंडवना,  आंबेगाव बुद्रुक, बोपोडी, औधं या भागांत नव्याने कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रांत विशिष्ट क्षेत्र, विशिष्ट इमारती, गृह निर्माण सोसायटी येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळल्यास कार्यक्षेत्राचे साहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी म्हणून लगेचच परिसर सील करतील.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा संपूर्ण आदेश पुढीलप्रमाणे – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.