Pune New Covid Guidelines: यंदा नववर्षाच्या स्वागताला कोविडचे विघ्न; नो पार्टीज,नो सेलिब्रेशन!

एमपीसी न्यूज – इतर देशांप्रमाणे भारतात सुद्धा ओमायक्रोनचा धोका वाढू लागला आहे. भारतातील महाराष्ट्रात ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याने ही चिंता आणखी वाढली आहे.नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर    राज्य शासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पुण्यातही नवी नियमावली घोषित करण्यात आली. 

ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले नियम – 

  • बंद जागेत विवाह सोहळा आयोजित होणार असेल तर त्यासाठी केवळ 100 जणांच्या उपस्थितीची मर्यादा
  • मोकळ्या जागेतील विवाहसोहळ्यास जास्तीत जास्त 250 आणि जागेच्या क्षमतेनुसार केवळ 25 टक्के उपस्थितीची परवानगी
  • सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम बंदीस्त जागेत आयोजित केल्यास केवळ 100 जणांना, तर मोकळ्या जागेत 250 जणांना परवानगी
  • क्रीडा स्पर्धा किंवा इतर स्पर्धांचे आयोजन केल्यास प्रेक्षक क्षमतेच्या केवळ 25 टक्के उपस्थितीला परवानगी
  • रेस्टॉरंट, फिल्म, सिनेमा आणि नाट्यगृहांसाठी केवळ 50 टक्के उपस्थितीची मर्यादा

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संपुर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असून त्याअंतर्गत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत एकत्र येण्यास परवानगी नाही, त्यामुळे यंदाच्या नववर्षाच्या स्वागताला कोविडचे विघ्न आल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.