Pune : काश्मिरी लोकांच्या भल्यासाठी नवीन राजकीय पक्ष काढणार- शाह फैजल

एमपीसी न्यूज – नोकरीला रामराम केल्यानंतर कुठल्या तरी राजकीय पक्षात जाण्याचा माझा विचार होता. परंतु युवकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता नवीन राजकीय पक्ष काढावा लागेल, असे सांगत भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन बाहेर पडलेले शाह फैजल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सरहद आणि अर्हम फाऊंडेशनने आयोजित केलेल्या काश्मीर महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाह फैजल हे 2010 साली यूपीएससी परीक्षेत देशात पहिले आले होते.

यावेळी शाह फैजल म्हणाले, काश्मीरमधील युवकांनी मतदान करण्याचे सोडून दिले आहे. कारण त्यांचा तेथील राजकीय पक्षांवर विश्‍वास नाही. त्यांच्या हक्कासाठी लढणारा कोणीही नाही. त्यामुळे काश्मीरी लोकांनी राजकीय लोकांकडून भले होईल ही अपेक्षा सोडून दिली आहे.

दरम्यान, काश्मीरी युवकांचा मला ज्या पध्दतीने प्रतिसाद मिळत आहे, ते पाहून काश्मीरी लोकांच्या भल्यासाठी नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा विचारात असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.