BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे जिल्ह्यातील केटरर्सचा 15 एप्रिल रोजी महामेळावा

0 120
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- केटरिंग क्षेत्रातील सरकारदरबारपासून सर्व प्रकारच्या समस्यांची चर्चा करण्यासाठी ‘न्यू पुणे केटरिंग असोसिएशन ‘ची स्थापना पुण्यात 15 एप्रिल रोजी ​सायंकाळी ​साडेसहा वाजता हॉटेल ताज विवांता (ब्लू डायमंड ) येथे होत असल्याची माहिती अध्यक्ष मन्साराम माळी, उपाध्यक्ष बाबूसिंह पुरोहित, उपाध्यक्ष बाबुलाल गौड यांनी दिली. यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात मन्साराम माळी, बाबूसिंह पुरोहित, बाबुलाल गौड​,​काळुराम गेहलोत, दलपतसिंह पुरोहित, मनोज वैष्णव यांचा समावेश आहे.

‘महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन’चे अध्यक्ष किशोर सरपोतदार हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असतील, उपाध्यक्ष जी.एस.बिंद्रा हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील केटरिंग क्षेत्रातील व्यावसायिकांनी (आउटडोअर ) एका छत्राखाली यावे, या उद्देशाने ही नवी शिखर संस्था स्थापन करण्यात येत आहे . जीएसटी करप्रणालीतील प्रश्न ,एफडीएचे नियम समजावून सांगणे, सरकारदरबारी व्यावसायिकांच्या समस्या मांडणे, समाजात या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नवनवे उपक्रम आयोजित करणे, यासाठी ही असोसिएशन उपक्रम आयोजित करणार आहे. या महामेळाव्यात केटरिंग क्षेत्रातील करियरसाठी उपयुक्त ठरणारी दोन व्याख्यानेही या मेळाव्यात होणार आहेत. नव्या संस्थेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.