Pune : डिसेंबर महिन्यात लग्न, पती-पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : अवघ्या काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार उघडकीस आला आहे. (Pune) भाेर तालुक्यातील केळवडे परिसरात ही घटना घडली. पत्नीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने पतीनेही आत्महत्या केली.

धीरज संभाजी कोंडे (वय 29) आणि समद्धी धीरज कोंडे (वय 22) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. डिसेंबर महिन्यातच या दोघांचा विवाह झाला होता. धीरज हा कृषी शाखेची पदवीधर आहे तर समृद्धीने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आठ दिवसांपूर्वी समृद्धी बावधन येथे माहेरी गेली होती. तिने मंगळवारी (28 मार्च) पिरंगुट येथे मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

AAP :  ‘मोदी हटाव, देश बचाव’; आपची शहरात फलकबाजी

पत्नीने आत्महत्या केल्यानंतर धीरजला धक्का बसला. (Pune) त्यानंतर त्याने गुरुवारी (30 मार्च) केळवडेतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांच्या अंतराने नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर भोर तालुक्यात शोककळा पसरली. दोघांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.