Pune News : नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला येणार गती; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा आणि मुळा-मुठा या नद्यांचा एकात्मिकरित्या विचार करुन नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतल्यानंतर आता या प्रकल्पाला ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’चा दर्जा मिळाला असून या दर्जामुळे या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.

हा दर्जा मिळण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विशेष प्रयत्न केले होते. या एसपीव्हीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून महापौर मोहोळ जबाबदारी सांभाळणार आहेत.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘नदी पुनरुज्जीवन कामाच्या अनुषंगाने जिओटेक्रिकल, इनंव्हेस्टिगेशन रिपोर्ट, हायड्रोलॉजी, हायड्रोलिक्स रिपोर्ट, एरिया असेसमेंट, एल्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, कन्सेप्ट मास्टर प्लान आदी कामे पूर्ण झालेली आहेत.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविल्याने नदीची पूरवहन क्षमता वाढणे, नदीलगतचा रहिवासी भाग सुरक्षित होणे, नदी किनारी हरित पट्टा विकसित होणे, पब्लिक स्पेसेस अंतर्गत नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, बेंचेस, उद्यान विकसित होणे, नदीलगत असलेली वारसा स्थळे जतन करणे, नदी किनारी होणारे अतिक्रमणे, राडारोडा/कचरा टाकण्यास आळा बसणार असून नदीतील पाणी स्वच्छ राहणेस मदत होणार आहे, असे विविध उद्देश एका प्रकल्पातून साध्य होणार आहेत.

‘नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणेसाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करण्याबाबतचा विचार करण्यात आला आहे. या मध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांस स्थानिक संस्थांचे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी रक्कमेची तरतूद करणे, मा. केंद्र शासन, मा. राज्य शासन याचे विविध योजनामधून निधी उपलब्ध करणेस आंतरराष्ट्रीय संस्थाकडून ग्रेट/निधी उभारणे यांचा समावेश आहे, असेही महापौर यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी कंटोन्मेट बोर्ड व पुणे महानगरपालिका हद्दीमधून बाहत असल्यामुळे व नदीच्या जागेबाबत महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत जलसंपदा विभाग, पुणे यांचाही संबंध येत असल्याने नदी पुररुज्जीवन प्रकल्प राबविणे करिता वरील सर्व संस्था मिळून स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्वापन करण्याची आवश्यकता होती. स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्थापन करणेसाठी तसेच स्पेशल पर्पज व्हेईकलला (SPV) नदीची जागा हस्तांतरित करणेवायतचा प्रस्ताव मे राज्य शासनाकडे सादर करणेस मा. मुख्य सभा, पुणे महानगरपालिका ठ.क.1035, दि. 23/02/2018 अन्वये मान्यता मिळाली, अशीही माहिती महापौरांनी दिली.

अशी असेल SPV

महापौर, पुणे (SPVचे पदसिध्द अध्यक्ष असतील)
उप महापौर, पुणे
अध्यक्ष स्थायी समिती, पुणे म.न.पा.
सभागृह नेता, पुणे म.न.पा. अध्यक्ष, शहर सुधारणा समिती, पुणे म.न.पा.
सर्व पक्षनेते, पुणे म.न.पा.
विभागीय आयुक्त, पुणे विभाग
महापालिका आयुक्त, पुणे म.न.पा.
महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
विशेष कार्याधिकारी, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड
शहर अभियंता, पुणे म.न.पा.
मुख्य अभियंता, पुणे म.न.पा.
नदीकाठ विकसन/ संवर्धन सबंधित क्षेत्रातील तज्ञ

हा प्रकल्प राबविताना टप्याटप्याने प्रकल्प सुरु करण्याच्या दृष्टीने तीन प्राधान्याने भागांचा विचार करण्यात आला आहे, जेणे करुन प्रकल्प कसा असणार आहे याबाबतची कल्पना या पायलट स्ट्रेच मधून येणार आहेत.

१. संगमपुल ते बंडगार्डन-दोन्ही काठ मिळून 9.2 किमी
२. मुंडवा ते खराही- दोन्ही काठ मिळून 7.1 किमी
३. ऑध ते बाणेर- दोन्ही काठ मिळन 8.5 किमी

तसेच विशेष उद्देश वाहनामध्ये प्रस्ताविलेल्या सदस्यांच्या व्यतिरिक्त महापौर/उपमहापौर, पिंपरी चिंचवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.