Pune News : डुकरांच्या नियंत्रणासाठी निधीची तरतूद – हेमंत रासने

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका हद्दीतील मोकाट आणि भटक्या डुकरांच्या नियंत्रणासाठी फॉर्मर चॉईस या संस्थेच्या निविदेला स्थायी समितीने मंजूरी दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘फॉर्मर चॉईस संस्थेने एका डुकरासाठी 1425 रुपये इतका दर दिला आहे. लिलावापोटी या संस्थेकडून महापालिकेला 1425 रुपये प्राप्त होणार आहेत. अनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार भटके आणि मोकाट डुकरे पकडण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी ठेकेदाराच्या वाहनांमार्फत कारवाई करण्यात येते.

या कारवाईत पकडण्यात आलेल्या डुकरांची अधिकृत कत्तलखान्यात विल्हेवाट लावण्यात येते. 31 जुलै 2018 ते मार्च 2021 या कालावधीत 40 हजार 386 डुकरे पकडण्यात आली. लिलावापोटी महापालिकेला सुमारे 60 लाख 70 हजार रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली.’

फुरसुंगीत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

कचरा डेपोमुळे पिण्याचे पाणी दूषित झालेल्या आणि महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या फुरसुंगी गावात आवश्यकतेनुसार टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 99 लाख 82 हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.