Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 6.16 लाख घरगुती ग्राहकांचे वीजबिल थकीत, परिमंडळात 425 कोटी थकबाकी

एमपीसी न्यूज – वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. सध्याच्या घडीला पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 10 लाख 34 हजार 704 ग्राहकांकडे 425 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 6 लाख 16 हजार 194 घरगुती ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात घरगुती 4 लाख 40 हजार 226 ग्राहकांकडे 137 कोटी 81 लाख, वाणिज्यिक 73 हजार 728 ग्राहकांकडे 51 कोटी 46 लाख, औद्योगिक 5 हजार 589 ग्राहकाकंडे 7 कोटी 83 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये घरगुती 1 लाख 75 हजार 968 ग्राहकांकडे 58 कोटी 85 लाख, वाणिज्यिक 28 हजार 200 ग्राहकांकडे 23 कोटी 94 लाख व औद्योगिक 5 हजार 684 ग्राहकांकडे 11 कोटी 66 लाख रुपये थकीत आहेत.

तसेच महावितरणच्या मुळशी, राजगुरुनगर व मंचर विभागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 3 लाख 5 हजार 309 ग्राहकांकडे 133 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी आहे.

शनिवार, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

शनिवारी (दि.28) व रविवारी (29) कार्यालयीन वेळेत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. यासोबतच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.