-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : कोंढवा येथील घरफोडीत 1 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील दोन वेगवेगळ्या घरफोडीत 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान लुल्ला नगर, कोंढवा खुर्द याठिकाणी घडली.

याप्रकरणी शेखर गोरडे (वय 64, रा.कोंढवा खुर्द, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर गोरडे यांच्या लुल्लानगर कोंढवा-खुर्द येथील राहत्या फ्लॅटचे कुलुप तोडून घरातील कॅनन लेन्स कॅमेरा व त्याचे इतर साहित्य असा 1 लाख 10 हजार रुपयांची हजार रुपयांची चोरी केली.

तसेच त्याठिकाणच्या बंगलो नं. 81 मध्ये राहणा-या ॲग्नेस मेनेझेस (वय 82) यांच्याही बंद घराच्या दरवाज्याचे लॉक तोडून चोरटयांनी घरातून रोख 10 हजार रुपये असे दोन्ही मिळून एकूण 1 लाख 20 हजार किंमतीचा ऐवज चोरुन नेला.

त्याचप्रमाणे अंजेश जगताप (वय 51, रा.शंकर रुक्मिणी अर्पाटमेंट, पहिला मजला, बी-3, माधव गेस्ट हाऊस समोर, कोंढवा-खुर्द, पुणे) यांच्याही घरातून डिव्हिआर चोरी करून नेला.

कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.