Pune News : 1 लाख पुणेकर कोरोनातून बरे; कोरोनासुद्धा बरा होऊ शकतो, हे पुणेकरांनी दाखवून दिले

पुणे शहरातील 1 हजार 456 जणांना सोमवारी (दि. 14 सप्टेंबर) कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याचे कारण नाही. योग्यवेळी तातडीने उपचार घेतल्यास कोरोनासुद्धा बरा होऊ शकतो, हे 1 लाख 532 पुणेकरांनी दाखवून दिले आहे.

पुणे शहरातील 1 हजार 456  जणांना सोमवारी (दि. 14 सप्टेंबर) कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1 लाख 532 झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद मानत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. 978 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 479 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 20  हजार 757 रुग्ण झाले आहेत.  आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 832 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 393 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सध्या पुणे शहरात केवळ 1 टक्केच कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यात आणखी वाढ करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केवळ आठवड्यालाच 1 बैठक न घेता मुक्काम ठोकावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आगामी काळात अजित पवार आणखीन काय धडाकेबाज निर्णय घेणार, याची पुणेकरांनाही उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.