Pune News: खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणातही 100 टक्के पाणीसाठा; टेमघरही लवकरच भरणार

Pune News: 100 per cent water storage in Khadakwasla, Varasgaon dam followed by Panshet; Temghar will also be filling up soon खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणांत 100 टक्के पाणीसाठा झाला आहे

एमपीसी न्यूज – पुणेकरांवर वरूणराजाने कृपा केली असून पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी 3 धरणांत 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर, चौथे धरणही लवकरच भरण्याच्या स्थितीत आहे.

खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणांत 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर, टेमघर धारण लवकरच भरणार आहे. खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले वरसगाव धरण 100 टक्के भरले आहे. त्यात 12.82 टीएमसी इतका साठा आहे.

आता चारही धरणांचा एकूण पाणीसाठा 28.61 टीएमसी इतका झालेला आहे. खडकवासला 1.96 टीएमसी (99.16%), पानशेत 10.65 टीएमसी (100%), वरसगाव 12.82 टीएमसी (100%), टेमघर 3.18 टीएमसी (85.91%) असा चारही धरणांत एकूण 28.61 टीएमसी म्हणजेच 98.15% पाणीसाठा आहे.


मागील वर्षी याच दिवशी 28.97 टीएमसी म्हणजेच 99.26% पाणीसाठा होता. ही चारही धरणे 100 टक्के भरणार असल्याने पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची काळजी मिटली आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत जोरदार पाऊस सुरूच आहे. पानशेत धरणातून खडकवासला धरणात 1980 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दिवसभरात 2568 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.