Pune Crime News : अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याने 11 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घराशेजारी असणाऱ्या बिल्डिंगच्या व्हरांड्यात मैत्रिणीसोबत खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पुण्यातील कोंढवा परिसरातील गोकुळ नगर मध्ये 26 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी निष्काळजी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिल्ल्या उर्फ पृथ्वीराज अजय साळुंखे (वय 11) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री साळुंखे (वय 28) यांनी दिली असून श्रीकृष्ण दिनकर ढमाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 26 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास मयत टिल्लू हा आरोपी श्रीकृष्ण ढमाले यांच्या मुलीसोबत त्यांच्या बिल्डींग मधील व्हरांड्यात खेळत होता. यावेळी व्हरांड्यात असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर कोणतेही झाकण बसवण्यात आले नव्हते. खेळत असताना फिर्यादी यांचा मुलगा पाण्याच्या टाकीत पडला आणि आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे श्रीकृष्ण ढमाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.