Pune News: चोरट्यांनी पुण्यातून वर्षभरात 1200 वाहने लांबवली

एमपीसी न्यूज: पुणे शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या वर्षभरामध्ये शहराच्या विविध ठिकाणाहून तब्बल बाराशे वाहन चोरीला गेल्याचं समोर आला आहे. तर गेल्यावर्षी हा आकडा हजारांच्या घरात होता. यामुळे वाढत्या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

वाहन चोरीचे 67 हॉटस्पॉट

गेल्या काही वर्षात काही विशिष्ट ठिकाणाहून वारंवार वाहन चोरीच्या घटना घडल्याचा पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा चार पेक्षा अधिक वेळा ज्या ठिकाणाहून वाहन चोरीस गेल्याची घटना घडली आहे आशा 67 हॉटस्पॉट पोलिसांनी आयडेंटिफाय केले आहेत. वाहनचोरी रोखण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, चोरीला जाण्याची वेळ, कारणे, परिमंडळनिहाय चोरीला जाण्याची ठिकाणे आदींची माहिती काढली आहे.

या वेळात सर्वाधिक चोऱ्या

यंदा शहरात जानेवारीपासून आजवर एकूण १ हजार १८६ वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत, तर गतवर्षी ९७५ वाहनचोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरासमोर पार्किंगसाठी जागा नसल्याने ही वाहने रस्त्यावर लावतात. याचाच गैरफायदा चोरटे घेतात. सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्या हेरून वाहने चोरली जातात. बहुतांश वाहने सायंकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान चोरी होत असल्याचे, तर सकाळी ६ ते ९ दरम्यान सर्वात कमी वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. ८पेक्षा जास्त वेळा वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एकूण ८३ आरोपींची कुंडली काढली आहे.

वाहनचोरीच्या घटनांच्या तपाससाठी पोलिसांची पथके

वाहनचोरीच्या घटनांचा तपास तत्काळ व्हावा आणि अशा घटनांवर आळा बसावा, यादृष्टीने पोलिसांची पथके काम करीत आहेत. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले जातील. नागरिकांनीही आपल्या वाहनांना सुरक्षिततेसाठी आवश्‍यक काळजी घ्यावी. आशे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

वाहन चोरी रोखण्यासाठी ही काळजी घ्या

सोसायट्यांबाहेर सुरक्षारक्षक नियुक्त करणे.
दुचाकींचे जुने झालेले लॉक बदलणे.
सोसायटीमध्ये सीसीटीव्हींचा वापर वाढविणे
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.