Dangerous castles in Pune : शहरातील 14 धोकादायक वाडे उतरवले

एमपीसी न्यूज – शहरातील धोकादायक झालेल्या तब्बल २४५ वाड्यांना (Dangerous castles in Pune),  इमारतींना महापालिकेने कारवाईची नोटिसा बजाविल्या आहेत. तर १४ धोकादायक ठरणाऱ्या इमारती पालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. तर, ७ वाडे पुढील काही दिवसांत उतरवण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.
पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची  विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शहरात २४५ वाडे, इमारती धोकायक असल्याचे निश्चित करण्यात आले आहेत. या इमारतींच्या मालक आणि भाडेकरूंना दोन नोटीस देण्यात आल्या असून धोकादायक रचना काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र दोन नोटिसा देऊन देखील संबंधितांकडून कोणतीही कारवाई न झालेल्या अत्यंत धोकादायक इमारती पाडण्याची मोहिम पालिकेने (Dangerous castles in Pune) सुरु केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. अनेक ठिकाणी मालक आणि भाडेकरू वादात त्यांची वर्षानुवर्षे डागडुजी झालेली नाही. त्यामुळे हे वाडे धोकादायक अवस्थेत असून पावसाळ्यात ते कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका अशा वाड्यांचे सर्वेक्षण करते. यापूर्वी महापालिकेने २००८ मध्ये असे सर्वेक्षण करून अती धोकादायक, धोकादायक, कमी धोकादायक (Dangerous castles in Pune) असे वर्गीकरण केलेले होते.
या माहितीनुसार, दरवर्षी पालिकेच्या सर्वेक्षणात माहिती असलेल्या वाड्यांचे सर्वेक्षण केले. तसेच धोकादायक वाडयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते काढण्याबाबत निर्णय घेतला जातो. तसेच वाड्याबाहेरील बाजूस ‘वाडा धोकादायक’ असे फलकही लावले जातात. यावर्षी पालिकेच्या पाहणीत २१ वाडे धोकादायक असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

https://www.youtube.com/watch?v=JrRY2anzJKQ&t=84s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.