Pune News: 1569 नागरिक कोरोनामुक्त, 2093 नवे रुग्ण, 44 जणांचा मृत्यू

आतापर्यंत यामुळे 2 हजार 512 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजार 453 सक्रिय रुग्ण आहेत

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. रविवारी तब्बल 1569 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 7 हजार 235 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2093 नवे रुग्ण आढळले. 44 जणांचा मृत्यू झाला. 910 गंभीर रुग्ण असून, त्यात 478 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 5 हजार 905 रुग्ण झाले आहेत. 86 हजार 940 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत यामुळे 2 हजार 512 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजार 453 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

धनकवडीतील 60 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 60 वर्षीय महिलेचा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 76 वर्षीय पुरुषाचा, पुणे स्टेशनवरील 73 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, गणेश पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 70 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, पाषाणमधील 75 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 60 वर्षीय महिलेचा.

पद्मावतीतील 81 वर्षीय पुरुषाचा, भवानी पेठेतील 50 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 55 वर्षीय पुरुषाचा, गोखलेनगरमधील 55 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 47 वर्षीय महिलेचा, नवी पेठेतील 60 वर्षीय पुरुषाचा, चंदननगर मधील 38 वर्षीय पुरुषाचा, उरुळी देवाचीमधील 60 वर्षीय महिलेचा, 30 वर्षीय पुरुषाचा, दांडेकर पुलावरील 58 वर्षीय महिलेचा.

कोंढव्यातील 68 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 65 वर्षीय पुरुषाचा, आंबेगाव बुद्रुकमधील 72 वर्षीय पुरुषाचा, कोंढवे धावडेतील 22 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 78 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्डमधील 57 वर्षीय पुरुषाचा, वानवडीतील 80 वर्षीय महिलेचा D. H. औंधमध्ये, 80 वर्षीय महिलेचा कमांड हॉस्पिटलमध्ये, मुंढव्यातील 75 वर्षीय पुरुषाचा.

विश्रांतवाडीतील 53 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 71 वर्षीय महिलेचा, कसबा पेठेतील 53 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 70 वर्षीय पुरुषाचा, नारायण पेठेतील 71 वर्षीय महिलेचा, वारजेतील 62 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा, वडगांवशेरीतील 60 वर्षीय पुरुषाचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये.

वडगाव बुद्रुकमधील 70 वर्षीय महिलेचा, धायरीतील 83 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, पाषाणमधील 45 वर्षीय पुरुषाचा लाईव केअर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 67 वर्षीय पुरुषाचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 50 वर्षीय पुरुषाचा D. H. औंधमध्ये.

बिबवेवाडीतील 75 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, डिमार्टमधील 68 वर्षीय पुरुषाचा संचेती हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 14 वर्षीय मुलीचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 60 वर्षीय महिलेचा परमार हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.