Pune News : पोलिस अधिकार्‍याच्या 21 वर्षीय मुलाचा निर्घृण खून, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज – पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पोलिस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलाचा निर्घुण खून करण्यात आला. एका मुलीसह चार ते पाच जणांच्या टोळक्याने हा खून केलाय. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे मंगळवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. 

गिरीधर उत्रेश्वर गायकवाड (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणून काम पाहतात. याप्रकरणी मृताचा भाऊ निखिलकुमार याने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत गिरिधर हा मंगळवारी रात्री घरी बसला होता. यावेळी त्याच्या मोबाईलवर एका मुलीचा फोन आला आणि त्यानंतर तो घराबाहेर पडला. फिर्यादी निखील कुमार यांनी घरातून बाहेर पडताना कुठे चालला असे विचारले असता त्याने मैत्रिणीचा फोन आला असून तिला भेटून येतो असे सांगितले. दरम्यान अर्धातास झाल्यानंतरही गिरीधर परत न आल्याने आई वडील काळजीत होते. इतक्यात त्याचा खून झाल्याची माहिती त्यांना मिळाली.

 

घटनास्थळी गिरीधर याची आई व निखील कुमार पोहोचले असता गिरीधर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. इतक्यात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात गिरीधर याचा चाकूने खून केल्याचं निष्पन्न झाले आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.