Pune News : पुणे महापालिकेत 23 गावांचा अखेर समावेश

एमपीसी न्यूज – उर्वरित 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असून अंतिम अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे प्रदीर्घ विलंबानंतर अखेर 23 गावे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत.

पुणे महापालिकेत समावेश झालेल्या 11 गावांतील सरकारी दवाखाने, शाळा, पाणी पुरवठा योजना, अंगणवाड्या, अधिकारी व कर्मचारी यांना महापालिकेत वर्ग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्या होत्या.

त्याचवेळी नव्याने समावेश होणाऱ्या 23 गावांतील यंत्रणाही महापालिकेत समावून घेण्यात येईल; मात्र त्याची कार्यवाही अधिसूचना निघाल्यानंतर होणार आहे.असेही पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज अधिसूचना काढण्यात आली आहे.

पुणे महापालिका हद्दीत पुढील गावांचा समावेश करण्यात आला आहे –
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडक वासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडे, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.