Pune News : पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश ; अधिसूचना जारी

एमपीसी न्यूज : अखेर पुणे महापालिकेच्या हद्दीत 23 गावे समावेश करण्याची अधिसूचना राज्यसरकारकडून जारी करण्यात आली.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 3/3 अ तरतुदी नुसार पुणे शहराच्या सिमात फेरफार करण्याचा इरादा जाहीर अधिसूचनेच्या माध्यमातून केला आहे.

दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला याबद्दल हरकती व सूचना असल्यास विभागीय आयुक्तांकडे अधिसूचना प्रसिद्धीनंतर 30 दिवसांच्या आत दाखल करण्याची मुभा असणार आहे.

सर्व हरकती व सूचनांचा गांभिर्यपूर्वक विचार करून त्याचा समावेश केला जाईल, असे आश्वसन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या या गावांमध्ये महाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), पिसोळी, मांजरी (बु.), नऱ्हे, मंतरवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नांदेड, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, नांदोशी-सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, वाघोली, किरकटवाडी, खडकवासला, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि होळकरवाडी यांचा समावेश आजपासून झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

अशी असेल नवीन पुण्याची हद्द….

282 चौ. कि.मी.- 11 गावे समाविष्ट होण्यापूर्वी

333 चौ. कि.मी.- 11 गावे समाविष्ट झाल्यानंतर

485 चौ. कि.मी.- 23 गावे समाविष्ट झाल्यानंतरचे क्षेत्र

152 चौ. कि.मी.- शहराची आणखी होणारी वाढ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.