Pune News : पुणे विभागातील 2,58,182 जण कोरोनामुक्त; 3 लाख 43 हजार 94 पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 2 लाख 58 हजार 182 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 94 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 987 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे विभागातील जिल्हानिहाय कोरोनाची सद्यपरिस्थिती

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 31 हजार 196 रुग्णांपैकी 1 लाख 84 हजार 649 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 366 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.87 टक्के आहे.

सातारा जिल्हा- सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 476 रुग्णांपैकी 16 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा- सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 929 रुग्णांपैकी 17 हजार 965 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 999 आहे. कोरोनाबाधित एकूण 965 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा- सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24 हजार 788 रुग्णांपैकी 14 हजार 762 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 95 आहे. कोरोनाबाधित एकूण 931 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा- कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 705 रुग्णांपैकी 24 हजार 282 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 699 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 889, सातारा जिल्ह्यात 898, सोलापूर जिल्ह्यात 543, सांगली जिल्ह्यात 749 तर कोल्हापूर जिल्ह्यात 620 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 13 हजार 870 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 43 हजार 94 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.