Pune News : कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली, 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील दुचाकी समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा (Pune News) मृत्यू झाला. कोरेगाव पार्क परिसरातील वाडिया महाविद्यालयासमोर असणाऱ्या ब्रिजवर 23 जानेवारी रोजी हा अपघात झाला. पियुष किरीट मांडलिया (वय 28, रास्ता पेठ, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 23 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पियुष हा दुचाकीने कोरेगाव पार्क परिसरातून जात होता. यावेळी त्याची दुचाकी भरधाव वेगात असताना भटका कुत्रा गाडीच्या समोर आला. यामुळे दुचाकी स्लिप होऊन पियुष खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात (Pune News) आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.