Pune News :  रक्षाबंधनानिमित्त  पीएमपीएल कडून  300 जादा बस

एमपीसी न्यूज –  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी रविवारी रक्षाबंधन सणानिमित्त दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतो. त्यामुळे पीएमपीएलकडून नियोजीत बस व्यतिरिक्त जादा 300 बसेस अशा एकूण 1 हजार 425 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पीएमपीएलने यासाठी वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द केल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनासाठी यावर्षी 22 व 23 ऑगस्टला जादा बसचे नियोजन केले आहे.

तसेच, महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणेकामी व वाहतूक नियंत्रण करणेकामी नेमणूक करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.