Pune News : 45 खासगी रुग्णालयांचे 3,107 बेड्स महापालिकेच्या ताब्यात 

एमपीसी न्यूज – 45 खासगी रुग्णालयांचे 3,107 बेड्स महापालिकेच्या ताब्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

पुणे शहरातील 45 खासगी रुग्णालयांचे 3,107 बेड्स पुणे महापालिकेने नियंत्रणासाठी ताब्यात घेतले असून यात ऑक्सिजन शिवायचे 972, ऑक्सिजनचे 1695, व्हेंटिलेटरशिवायचे ICU 216 तर व्हेंटिलेटरचे 224 बेड्स आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 84.55 टक्क्यांवर आहे. अवघे 13.09 टक्के एक्टिव्ह केसेस असून,  मृत्युदर 2.35 टक्क्यांवर स्थिर आहे. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुद्धा 51.59 दिवसांवर आला आहे, असेही महापौरांनी सांगितले.

आतापर्यंत 1 लाख 13 हजार 786 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. कोरोनाच्या रोज 5 हजारांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे 1500 ते 2 हजार रुग्ण वाढते आहेत. त्यामध्ये 1364 नवे रुग्ण आढळले. 957 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 492 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 34 हजार 29 रुग्ण झाले आहेत.  आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 167 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 76 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. औषध वितरणात होणारा गैरप्रकार  रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्‍याचा इशारा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.