Pune News : सरसेनापती हंबीरराव मोहिते पुण्यस्मरणानिमित्त आयोजित शिबिरात 333 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या 333 व्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 333 जणांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी ससून रक्तपेढीची मदत घेण्यात आली होती.

चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील, शेखर मोहिते पाटील, विरेंद्र संभाजीराजे मोहिते पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. रक्त संकलन करण्यासाठी ससूनच्या रक्तपेढीची निवड करण्यात आली होती. या शिबिरात 333 जणांनी रक्तदान केले.

_MPC_DIR_MPU_II

कार्यक्रमाचे उद्घाटन अकलुजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे व कासारवाडी येथील भैरवनाथ ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष काळुराम लांडगे यांच्या हस्ते झाले.

यावेळी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा गायत्री संभाजीराजे मोहिते पाटील-बाबर, सिनेअभिनेते प्रतिक मोहिते पाटील, राजेंद्र मोहिते, संदेश मोहिते पाटील, शलाका मोहिते, चंचल मोहिते-काळे, धिरज घाटे, पोलीस निरीक्षक विशाल मोहिते पाटील, तेजस मोहिते, धनंजय जाधव, गणेश मोहिते पाटील, रणजित धगे पाटील, रोहित टिळक, सुर्यकांत रासने, डॉ. शैलेश मोहिते पाटील, डॉ. रणजित निकम, रणवीर मोहिते, सूरज भिसे, गणेश फनसे, चेतन चव्हाण, श्रिहरी काळे, राहुल नेवसे आदि उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.