Pune News: महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर  3596 हरकती   

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून  3596 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. तर आज शेवटच्या 2804 हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने गेल्या १ फेब्रुवारी रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला. या वेळी तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने 2017 च्या तुलनेत ही प्रभाग रचना पूर्णपणे वेगळी आहे. काही प्रभाग दोन, तीन आणि चार भागात विभागले आहेत. सोसायट्या, वस्त्यांचीही विभागणी झाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=C1cT7Wcd7Gc

प्रभाग रचनेबाबत नगरसेवकांमध्ये देखील नाराजी असून, हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांची चिंता वाढली आहे.भाजपने या प्रभाग रचने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, अद्याप ही याचिका दाखल झाली नाही. निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या अधिसूचना व नकाशा एक सारखे नाही. जो भाग नकाशात आहे, तो अधिसूचनेत नाही व जो अधिसूचनेत नाही तो नकाशात आहे, असे प्रकार घडल्याने नागरिक व स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.