Pune News : ससून रुग्णालयात कोरोनामुळे एकाच दिवसात 37 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ससून रुग्णालयात एकाच दिवसात तब्बल 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील 19 जन हे ब्रॉड डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यूमुखी पडले होते. तर इतर रुग्णांचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला.

_MPC_DIR_MPU_II

ससून रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे हे रुग्णालय कोरोना रुग्णासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. सोमवारी मात्र या रुग्णालयाच्या बाहेर एक विदारक चित्र पाहायला मिळाले. रुग्णालयातील नवीन covid-19 इमारतीच्या बाहेर उपचारासाठी प्रवेश मिळावा मिळावा म्हणून रुग्णांची रांग लागली होती. तर शवविच्छेदन गृहाच्या बाहेरही मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांची रांग लागली होती.

दरम्यान सोमवारी पुणे जिल्ह्यात 86 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यातील 53 जण हे एकट्या पुणे शहरातील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.