Pune News: महापालिकेचा खाजगी शाळेला दणका , अर्ध्या तासात भरले 38 लाख रुपये

एमपीसी न्यूज: वानवडीतील प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेला मिळकतकर भरण्यासाठी दोन वेळा नोटीस दिली; पण तरीही थकबाकी भरली जात नव्हती. अखेर महापालिकेने या शाळेला टाळे ठोकले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात 38 लाख 39 हजार रुपयांचा धनादेश जमा केला. त्यानंतर शाळेचा टाळा काढण्यात आला.

वानवडीतील प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा असून, मनमानी शुल्क वाढ केल्याने या संस्थेतील पालकांनी यापूर्वी मोठी आंदोलने केली होती. या शाळेने गेल्या अनेक वर्षांपासून मिळकतकर भरलेला नाही त्यामुळे थकबाकी वाढत गेली.

शाळेच्या प्रशासनाने यापूर्वी चेक दिला होता. खात्यात पैसे नसल्याने हा चेक बाऊन्स झाला होता. त्यामुळे महापालिकेने त्यांना कर भरण्यास सांगितले. पण टाळाटाळ केली गेली.

पालिकेच्या मिळकतकर विभागाचे पथक सकाळी साडेअकरा वाजता वानवडीतील या शाळेत गेले. त्यांनी शाळेला टाळे ठोकल्यानंतर शाळेतील प्रशासनाची चांगलील धांदल उडली. त्यामुळे त्यांनी संबंधितांशी संपर्क साधून कारवाईची माहिती दिली.

महापालिकेची ही कारवाई होताच या संस्थेच्या वकिलांनी त्वरित धाव घेत चेक दिला जाईल, सील काढा, असे सांगितले. त्यानंतर या शाळेने 38 लाख 39 हजार 748 रुपयांचा 7 डिसेंबर 2021 तारखेचा चेक महापालिकेला दिला.

प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे, राजेश वाघमोरे, पेठ निरीक्षक किशोर भाडळे, अशोक भंडारी, अभिजित शिवरकर यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.